मानीमुनी अन् मी
शाश्वती भोसले
०७ ऑगस्ट २०२०
भटकंतीची आवड माझ्यामध्ये कुठून आली, देव जाणे. आजी-आजोबांनी झोपताना सांगितलेल्या गोष्टी आणि गायलेली अंगाई गीते यावर बालपण पोसलेलं... त्यातूनच वाचनाची आवड जोपासली गेली. प्रत्येक सफरीत जीवघेण्या संकटातून बचावून आलेला सिंदबाद हिंमत न हारता प्रसंगावधान व संयम राखून प्रत्येक संकटावर मात करतो. ‘गलिवर्स ट्रॅव्हल्स्’मधला डॉ. गलिवर सागरी सफरीवर गेला असता लिलिपुटसारखे अद्भूत अनुभव घेतो. आम्ही राहत असू ते धर्…